GSAT-6A उपग्रहाचा संपर्क तुटला: इस्रो

GSAT-6A च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या शक्तिशाली दूरसंचार उपग्रहाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोशी संपर्क तुटला आहे. इस्रोनंच ही माहिती दिली. हा वैज्ञानिकांसह भारतीय सैन्यदलांसाठी मोठा हादरा असल्याचं मानलं जातं. लष्कराच्या दूरसंचार सेवांना शक्तिशाली बनवणाऱ्या या उपग्रहाचं गुरुवारी संध्याकाळी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. मात्र, ४८ तासांच्या आतच या ‘मिशन’ला मोठा झटका बसला आहे. […]