अवघ्या काही तासात कमी होईल मूळव्याधीचा त्रास

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. गॅस, अपचन, तणावग्रस्त जीवनशैली, चूकीच्या पद्धतीचा आहार यामुळे मूळव्याधीचा त्रास बळावतो. मूळव्याधीची समस्या गंभीर झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यावर उपचार केले जातात.

घरगुती उपाया…
हा त्रास गंभीर टप्प्यावर गेल्यानंतर मलविसर्जनासोबत रक्त पडणं, त्याजागी सूज जाणवणं, वेदना होणं हा त्रास बळावतो. हा त्रास होत असल्यास नीट बसणं, पाठीवर झोपणं हेदेखील त्रासदायक होतं. मग अशावेळेस वेदना, त्रास कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो. अनेकदा मूळव्याधीचं दुखणं हे पोट साफ न होण्याच्या समस्येमधून वाढते. हळूहळू हा बद्धकोष्ठतेचा त्रास मूळव्याधीमध्ये बदलतो.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत करते. याकरिता अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कापसाचा बोळा बुड्वून तो त्रास होणार्‍या जागी लावावा. यामध्ये अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि कोरफडीचा गर हे मिश्रण एकत्र करूनही लावल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.

Post Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *