OnePlus 6 होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत

OnePlus 6 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आज भारतात लॉन्च करणार आहे. बुधवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन लॉन्च केला होता. त्यानंतर आज भारत आणि चीनमध्ये हा फोन लॉन्च केला जाणार आहे. OnePlus 6 मध्ये iPhoneX प्रमाणे नॉच डिस्प्ले देण्यात आला असून यामध्येच फ्रंट कॅमेरा, इअरपीस आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहे. जुन्या OnePlus प्रमाणे या फोनमध्येही क्वालकॉमचं सर्वात पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन देण्यात आलं आहे. यावेळी OnePlus ने फोनमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेजचा पर्याय दिला आहे.

OnePlus 6 ची किंमत – अमेरिकेत OnePlus 6 च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 529 डॉलर (जवळपास 35,800 रुपये) आहे. तर 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 579 डॉलर (जवळपास 39,200 रुपये) आहे. 8 डीबी रॅम 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 629 डॉलर म्हणजे जवळपास 42 हजार 600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, मिरर ब्लॅक आणि सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन या रंगांमध्ये उपलब्ध असेल. 22 मे पासून या फोनचा ओपन सेल सुरू होईल, यामध्ये दोन्ही ब्लॅक कलर व्हेरिअंट उपलब्ध असतील, तर सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन 5 जूनपासून उपलब्ध होईल.

भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असेल याबाबतची घोषणा आज कंपनीकडून केली जाणार आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 36,999 रुपये असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 8 डीबी रॅम 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये असू शकते. भारतात अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी हा फोन 21 मे पासून उपलब्ध असेल.

Post Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *