येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात, २४ तासात जाऊ शकते खुर्ची

भाजप नेते येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सरकार राखण्यासाठी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. २४ तासांत सर्वोच्च न्यायालयात बहुमताचा आकडा सिद्ध करता आला नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपदा सोडावं लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना येत्या २४ तासांत ११२ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत त्यांना ही यादी सादर करावी लागणार आहे. त्यामुळे २४ तासांत त्यांना आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपकडे सध्या १०४ आमदारांचं पाठबळ आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी ८ आमदारांचा पाठिंबा हवा आहे.

दोन अपक्ष आणि बीएसपीच्या एका आमदाराने त्यांना पाठिंबा दिला तर हा आकडा १०७ पर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्यांना आणखी ५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. मात्र पाच आमदारांचा पाठिंबा मिळवणं कठिण असल्यानं येडियुरप्पा त्यात यशस्वी होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Post Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *