भाजपला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत तर देवेगौडांशी युती करू – सुधीर मुनगंटीवार

कर्नाटकमध्ये भाजपला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही देवेगौडांशी युती करू अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 12 मेला मतदान होणार आहे तर 15 मे ला निकाल आहेत. कर्नाटकमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. राहुल गांधींनी तसंच देवेगौडांनी आपलं सर्वस्व या निवडणुकीत पणाला लावलं . आता मोदींचा करिश्मा चालतो की सिद्धरमय्यांच्या प्रतिमेला लोक पुन्हा स्विकारतात याची सर्वत्र चर्चा आहे. काँग्रेससुद्धा जेडीएसच्या बाहेरून पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. कर्नाटक निवडणुकांनतर काँग्रेस अजून एक राज्य गमावेल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

Post Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *