स्वाती माझा पहिला क्रश होती, माझ्या बायकोला सांगू नका : धोनी

चेन्नई : नुकत्याच एका कार्यक्रमात धोनीने आपल्या पहिल्या क्रशचं नाव सांगितलं. इतकंच नाही, तर तिचं नाव माझ्या बायकोला सांगू नका, असं म्हणायला तो विसरला नाही. एका इव्हेंटला धोनीसह चेन्नई सुपरकिंग्समधल्या सुरेश रैना, रविंद्र जाडेजा, शेन वॉटसन अशा क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. ‘तुझ्या पहिल्या क्रशबाबत मनात विचार कर’ असं जादूगर धोनीला सांगितलं.

‘तिच्या नावात a हे अक्षर आहे ना?’ असा प्रश्न विचारताच धोनी हसला. ‘पण प्रत्येक मुलीच्या नावात ए अक्षर असतं. मला वाटतं तिच्या नावातलं तिसरं अक्षर a आहे’ असं जादूगार पुढे म्हणाला. अखेर त्याने धोनीच्या डोक्यावर एक फलक धरला, त्यावर ‘स्वाती’ हे नाव लिहिलं होतं.

‘होय, स्वाती माझा पहिला क्रश होती, पण तिचं नाव माझी पत्नी साक्षीला सांगू नका’ असं धोनी डोळा मारत म्हणाला. आता ही स्वाती धोनीसोबत शाळेत होती की त्याच्या घराशेजारी राहायची, हा प्रश्न धोनीच्या चाहत्यांना पडला आहे.

Post Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *