स्वाती माझा पहिला क्रश होती, माझ्या बायकोला सांगू नका : धोनी

चेन्नई : नुकत्याच एका कार्यक्रमात धोनीने आपल्या पहिल्या क्रशचं नाव सांगितलं. इतकंच नाही, तर तिचं नाव माझ्या बायकोला सांगू नका, असं म्हणायला तो विसरला नाही. एका इव्हेंटला धोनीसह चेन्नई सुपरकिंग्समधल्या सुरेश रैना, रविंद्र जाडेजा, शेन वॉटसन अशा क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. ‘तुझ्या पहिल्या क्रशबाबत मनात विचार कर’ असं जादूगर धोनीला सांगितलं. ‘तिच्या नावात a हे […]

आयपीएल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मुंबईवर १४ धावांनी विजय

बेंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सवर १४ धावांनी विजय मिळवला. मागील 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलेल्या बेंगळुरूला अखेर आज विजयाची चव चाखता आली. या सामन्यात बेंगळुरूनं मुंबईसमोर विजयासाठी १६८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. वीस षटकांच्या अखेरीस मुंबईला ७ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. बेंगळुरूकडून ग्रँडहोमने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर […]

पराभवानंतर विराटला मोठा झटका, 12 लाखांचा दंड

विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. विराटला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ बाद २०५ धावांचा डोंगर उभा केला. पण ३४ चेंडूत एमएस धोनीने ७० धावांची तुफानी खेळी करुन आरसीबीच्या तोंडातून विजयाचा घास […]

आयपीएल 2018 : गंभीर सोडले कर्णधारपद

गौतम गंभीरने दिल्ली संघाच्या कर्णधारपदचा राजीनामा दिला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वामध्ये दिल्ली संघाने आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये सहा सामन्यामध्ये पाच पराभव स्वीकारले. 11 व्या सत्रातील पराभवाची जबाबदारी घेत गौतमने दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत गौतम गंभीरने ही माहिती दिली. गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएलच्या […]

स्मिथ आणि वॉर्नरवर घातलेली बंदी योग्य

“कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घातलेली बंदी योग्यच आहे”, असं ठाम मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलंय. सचिन तेंडुलकरनं या संदर्भात एक ट्विट केलं असून स्मिथ-वॉर्नरवरील बंदीच्या निर्णयाचं स्वागत केलंय. चेंडू कुरतडल्याप्रकरणी सचिनंनं ट्विट केलंय. “क्रिकेट खेळ हा पारदर्शकपणे खेळला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. जे काही […]

बॅनक्राफ्टला आणखीन एक जबरदस्त धक्का

लंडन : केपटाऊन टेस्ट मॅचमध्ये बॉल टेम्परिंग बॅटसमन कॅमरून बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातलीय. त्यानंतर आता बॅनक्राफ्टला आणखी एका मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इंग्लिश क्रिकेट काऊंटी सोमरसेटनं बॅनक्राफ्टवर २०१८ सीझनसाठी बंदी घातलीय. कॅमरूनशीही संवाद साधला तेव्हा त्यानं आपली चूक कबूल केली आणि आपण त्यावर खजिल असल्याचंही म्हटलंय… क्लबशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची त्यांनी माफी […]