पुणे : तीन मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू

पुणे: उन्हाळी शिबीरानिमित्त आलेल्या 3 मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 3 पैकी एका मुलाचा मृतदेह सापडला असून उर्वरित दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. चेन्नईतील इंग्रजी शाळेतील काही विद्यार्थी पुण्यातील मुळशी धरणाजवळ समर कॅम्पसाठी आले आहेत. यातील 3 मुलं कातरखडक परिसरात पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यांचा बुडून […]

मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना धमकीचे पत्र

पुणे – कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना धमकीचे पत्र आले आहे. “एकबोटे कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी देऊन त्यांचा एन्काउंटर करणार’ अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. एकबोटे कुटुंबीयांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कुटूंबाला पोलीस संरक्षणाची मागणीही करण्यात आली आहे. नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी शिवाजीनगर पोलिसांत याबाबतची तक्रार […]

ज्यूटच्या नावाखाली “पॉली प्रोपिलीन’चा बाजार

पुणे : राज्यशासनाने नुकत्याच केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या नावाखाली शासनाच्या याच आदेशात बंदी घालण्यात आलेल्या “नॉन ओव्हन पॉली प्रोपिलीन’ पिशव्यांची ज्यूट बॅग म्हणून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक ते सव्वा रुपयाला असलेली ही पिशवी दुकानदारांना तीन ते चार रुपयांना विकली जात आहे. अशा लाखो पिशव्या गेल्या आठवड्याभरात शहरात विक्री […]

अनधिकृत जाहिरातप्रकरणी 70 लाखांचे शुल्क

पुणे – अनधिकृत जाहिराती लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने सिझन मॉल आणि ऍमेनोरा सिटी मॉलवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, मॉलने उभारलेल्या जाहिरातींचे मोजमाप आकाशचिन्ह विभागाने पूर्ण केले असून या जाहिरातींपोटी तब्बल 70 लाखांचे शुल्क महापालिकेस भरण्याच्या नोटीस या दोन्ही मॉलला दिल्याची माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली. […]