OnePlus 6 होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत

OnePlus 6 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आज भारतात लॉन्च करणार आहे. बुधवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन लॉन्च केला होता. त्यानंतर आज भारत आणि चीनमध्ये हा फोन लॉन्च केला जाणार आहे. OnePlus 6 मध्ये iPhoneX प्रमाणे नॉच डिस्प्ले देण्यात आला असून यामध्येच फ्रंट कॅमेरा, इअरपीस आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहे. जुन्या OnePlus प्रमाणे […]

शिवसेनेच्या सर्वेक्षणात पक्षाला 16 खासदार

मुंबई – शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढल्यास राज्यातील 48 मतदारसंघांपैकी 16 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेने स्वबळ आजमवल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 21-23 जागांची लॉटरी लागू शकेल; मात्र भाजपला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणाच्या अहवालात वर्तवण्यात आले आहे. या अहवालामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका […]

मुंबई मेट्रो : पार केला ४० कोटी प्रवाशांचा टप्पा

घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने आपल्या सेवेच्या १४२३ व्या दिवशी ४०० दशलक्ष प्रवाशांचा टप्पा पार पाडला आहे. मुंबई मेट्रो वनने आपला पहिला १०० दशलक्ष प्रवाशांचा टप्पा अवघ्या ३९८ दिवसांत पार पाडला होता. २०१७-१८ या वर्षात संपूर्ण घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३ टक्के वाढ दिसून आली आहे. मुंबई मेट्रो वनद्वारे […]

निष्काळजीपणा भोवला, गाडीतून बाहेर काढलेला हात झाला शरीरापासून वेगळा

बीड : चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे एका प्रवाश्याच्या चांगलेच महागात पडले आहे. सुमो गाडीच्या खिडकीबाहेर हात काढणाऱ्या इसमास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत हात गमवावा लागल्याची घटना अंबाजोगाई जवळील लोखंडी सावरगाव जवळ गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. उस्मानाबाद येथील अर्जुन सोमनाथ डुरलेकर (वय ५०) हे नातेवाईकाच्या मुलीसाठी स्थळासंदर्भात अंबाजोगाईला आले होते. रात्री उस्मानाबादला परत […]

राज ठाकरेंना महिलांनी घेरलं, राज ठाकरेंनी दिली पोज

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा पार पडली. सभा सुरु होण्यापूर्वी एक वेगळचं चित्र स्टेजवर पहायला मिळालं. राज ठाकरे यांच्या हस्ते १०० महिलांना रिक्षा वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे स्टेजवर दाखल झाले आणि त्यानी या महिलांवर स्टेजवर बोलावलं आणि चक्क सेल्फी काढत असल्याचं चित्र पहायला […]

मंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू

मुंबई : मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय. दरम्यान, सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. माझगावच्या विनायक मजूर सहकारी संस्थेला हे उंदीर मारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. अमोल शेडगे यांच्या […]

एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजले

मुंबई : मुंबईत एका व्यावसायिकाने एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजले आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी डील असून एखाद्या व्यक्तीने एका फ्लॅटसाठी पहिल्यांदाच इतके पैसे मोजलेत. या व्यावसायिकाचे नाव नीरज बजाज असं आहे. त्याने वरळीतील अॅनी बेझंट रोडवर असणाऱ्या इमारतीत पन्नासाव्या मजल्यावर 1 हजार 587 चौरस मीटरचा हा फ्लॅट खरेदी केला […]

मुंबई विद्यापीठात युवासेनेचा भगवा फडकला

मुंबई । शिवसेनेचे नेतृत्व करणार्‍या ठाकरे घराण्यातील तिसर्‍या पिढीचा अर्थात आदित्य ठाकरे यांचा शिवसेना नेते म्हणून राजकीय सन्मान केल्यानंतर मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. पुढच्या वर्षी 2019मध्ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेली ही निवडणूक आदित्य ठाकरे यांना राजकीय पातळीवर सिद्ध करून दाखवण्यासाठी एक संधी होती. त्यामुळे आदित्य ठाकरे […]

उद्धव ठाकरे रिकाम्या हाताने माघारी

मुंबई : निधीवाटपच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी निघालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हात हलवत परत आलेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयाजवेळ पोहोचले होते. मात्र भेट होऊ शकलेली नसल्याने पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात जुंपण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी या मुद्यावर भेट घेऊन चर्चा करणार होते. मात्र या बैठकीला […]