OnePlus 6 होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत

OnePlus 6 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आज भारतात लॉन्च करणार आहे. बुधवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन लॉन्च केला होता. त्यानंतर आज भारत आणि चीनमध्ये हा फोन लॉन्च केला जाणार आहे. OnePlus 6 मध्ये iPhoneX प्रमाणे नॉच डिस्प्ले देण्यात आला असून यामध्येच फ्रंट कॅमेरा, इअरपीस आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहे. जुन्या OnePlus प्रमाणे […]

शिवसेनेच्या सर्वेक्षणात पक्षाला 16 खासदार

मुंबई – शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढल्यास राज्यातील 48 मतदारसंघांपैकी 16 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेने स्वबळ आजमवल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 21-23 जागांची लॉटरी लागू शकेल; मात्र भाजपला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणाच्या अहवालात वर्तवण्यात आले आहे. या अहवालामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका […]

मुंबई मेट्रो : पार केला ४० कोटी प्रवाशांचा टप्पा

घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने आपल्या सेवेच्या १४२३ व्या दिवशी ४०० दशलक्ष प्रवाशांचा टप्पा पार पाडला आहे. मुंबई मेट्रो वनने आपला पहिला १०० दशलक्ष प्रवाशांचा टप्पा अवघ्या ३९८ दिवसांत पार पाडला होता. २०१७-१८ या वर्षात संपूर्ण घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३ टक्के वाढ दिसून आली आहे. मुंबई मेट्रो वनद्वारे […]

डोंबिवलीत 19 वर्षीय तरुणाला जैन धर्माची दीक्षा

डोंबिवली – १९ वर्षाच्या तरुणाने जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. मंदार म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून हजारो नागरिकांच्या उपस्तिथीत जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. पहाटे ४:३० च्या जवळपास मंदारला जैन धर्माची दीक्षा देण्यात आली. आज पासून मंदार म्हात्रेच नाव मुनिराज मार्गशेखर असे असणार आहे. याबाबत मुनिराज मार्गशेखर / मंदार म्हात्रेच्या वडिलांनी म्हटले की, २०१८ […]

निष्काळजीपणा भोवला, गाडीतून बाहेर काढलेला हात झाला शरीरापासून वेगळा

बीड : चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे एका प्रवाश्याच्या चांगलेच महागात पडले आहे. सुमो गाडीच्या खिडकीबाहेर हात काढणाऱ्या इसमास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत हात गमवावा लागल्याची घटना अंबाजोगाई जवळील लोखंडी सावरगाव जवळ गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. उस्मानाबाद येथील अर्जुन सोमनाथ डुरलेकर (वय ५०) हे नातेवाईकाच्या मुलीसाठी स्थळासंदर्भात अंबाजोगाईला आले होते. रात्री उस्मानाबादला परत […]

पुणे : तीन मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू

पुणे: उन्हाळी शिबीरानिमित्त आलेल्या 3 मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 3 पैकी एका मुलाचा मृतदेह सापडला असून उर्वरित दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. चेन्नईतील इंग्रजी शाळेतील काही विद्यार्थी पुण्यातील मुळशी धरणाजवळ समर कॅम्पसाठी आले आहेत. यातील 3 मुलं कातरखडक परिसरात पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यांचा बुडून […]

मुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या

मुंबई: मुलुंड स्टेशनवर किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आली. दीपक चमन पटवा असं मयत व्यक्तीचं नाव असून ते मुलुंड पश्चिमला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन जात होते त्यावेळी एक महिला आणि पुरुषाशी त्यांची बाचाबाची झाली. बाचाबाचीत त्या दोघांनी पटवा यांना स्टेशनवर येत असलेल्या लोकलखाली […]

राज ठाकरेंना महिलांनी घेरलं, राज ठाकरेंनी दिली पोज

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा पार पडली. सभा सुरु होण्यापूर्वी एक वेगळचं चित्र स्टेजवर पहायला मिळालं. राज ठाकरे यांच्या हस्ते १०० महिलांना रिक्षा वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे स्टेजवर दाखल झाले आणि त्यानी या महिलांवर स्टेजवर बोलावलं आणि चक्क सेल्फी काढत असल्याचं चित्र पहायला […]

चौदावर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा

ठाणे : चौदावर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्वर खल्पे असे शिक्षकाचे नाव आहे. अन्वर हा एका खासगी शाळेत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी अन्वरने मुलीला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले होते. वर्ग सुटल्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर मुलीने झालेल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानुसार पालकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली. […]

मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना धमकीचे पत्र

पुणे – कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना धमकीचे पत्र आले आहे. “एकबोटे कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी देऊन त्यांचा एन्काउंटर करणार’ अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. एकबोटे कुटुंबीयांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कुटूंबाला पोलीस संरक्षणाची मागणीही करण्यात आली आहे. नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी शिवाजीनगर पोलिसांत याबाबतची तक्रार […]