येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात, २४ तासात जाऊ शकते खुर्ची

भाजप नेते येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सरकार राखण्यासाठी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. २४ तासांत सर्वोच्च न्यायालयात बहुमताचा आकडा सिद्ध करता आला नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपदा सोडावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना येत्या २४ तासांत ११२ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत […]

भाजपला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत तर देवेगौडांशी युती करू – सुधीर मुनगंटीवार

कर्नाटकमध्ये भाजपला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही देवेगौडांशी युती करू अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 12 मेला मतदान होणार आहे तर 15 मे ला निकाल आहेत. कर्नाटकमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. राहुल गांधींनी तसंच देवेगौडांनी आपलं सर्वस्व या निवडणुकीत पणाला लावलं . आता मोदींचा करिश्मा चालतो की सिद्धरमय्यांच्या प्रतिमेला लोक पुन्हा […]

आश्चर्यकारक : भारतातील १४ शहरं जगातील सर्वाधिक प्रदूषित

जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वाधिक भारतीय शहरांचा समावेश आहे. या यादीतील २० पैकी १४ प्रदूषित शहरं ही केवळ भारतात आहे. यात दिल्ली आणि वाराणसी या शहरांचाही समावेश आहे. या संघटनेच्या अहवालानुसार १० पैकी ९ जण हे सर्वाधिक प्रदूषकं असलेल्या हवेत श्वास घेत आहेत. कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या […]

शाळेच्या बसची ट्रेनला धडक; 14 विद्यार्थी ठार

रेल्वे क्रॉसिंगवर एका शाळेच्या बसने ट्रेनला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 14 विद्यार्थी ठार झाले आहेत. मृतांमध्ये 13 विद्यार्थी आणि वाहन चालकाचा समावेश आहे. या अपघातात 7 विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे हा अपघात झाला. कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी स्कूल बसमधून जात होते, […]

आसाराम बापूला जन्मठेप, अन्य दोघांना 20 वर्षे तुरुंगवास

जोधपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी कोठडीची हवा खात असलेल्या आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अन्य 2 आरोपींना 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेय. जोधपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय. रामरहिम खटल्याच्यावेळी हिंसा भडकली होती. दरम्यान, सुनावणीवेळी हिंसाचार भडकू नये यासाठी जोधपूरपासून दिल्लीपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसा […]

भाजपची साथ सोडेन- रामदास आठवले

मुंबई – दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास मी भाजपची साथ आणि मंत्रिपद सोडायला मागेपुढे पाहणार नाही, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. यासाठी रिपाइंचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना द्यायलाही मी तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजप आणि शिवसेनेच्या संबंधाबद्दल बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची नाराजी दूर व्हावी यासाठी […]

CBSE: १२वीची फेरपरीक्षा २५ एप्रिलला

सीबीएसई बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय येत्या १५ दिवसांत घेतला जाईल, असे आज केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. ही फेरपरीक्षा घ्यायची झाल्यास फक्त दिल्ली आणि हरयाणा या दोनच राज्यांत जुलै महिन्यात घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे […]

GSAT-6A उपग्रहाचा संपर्क तुटला: इस्रो

GSAT-6A च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या शक्तिशाली दूरसंचार उपग्रहाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोशी संपर्क तुटला आहे. इस्रोनंच ही माहिती दिली. हा वैज्ञानिकांसह भारतीय सैन्यदलांसाठी मोठा हादरा असल्याचं मानलं जातं. लष्कराच्या दूरसंचार सेवांना शक्तिशाली बनवणाऱ्या या उपग्रहाचं गुरुवारी संध्याकाळी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. मात्र, ४८ तासांच्या आतच या ‘मिशन’ला मोठा झटका बसला आहे. […]